Namo Shetkari Yojana 8th installment Date 2026 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अनेकांच्या मनात एकच प्रश्न फिरताना दिसतोय तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता नक्की कधी जमा होणार आहे हा विषय नीट समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण यात तुमच्यासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती स्पष्ट करून सांगितली आहे
सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीपासून हिवाळी अधिवेशन साधारणपणे 8 डिसेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि या अधिवेशनात पुरवणी मागणी सादर करणे आवश्यक असते नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता दिला जाण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते कारण यानंतरच राज्यपालांकडून मंजुरी मिळते मंजुरी मिळाल्यानंतर या हप्त्याच्या वितरणासाठी अधिकृत जीआर तयार केला जातो या जीआरमध्ये किती शेतकरी पात्र आहेत त्यासाठी किती निधी लागणार आहे याचा संपूर्ण तपशील नमूद केलेला असतो
Namo Shetkari Yojana 8th installment Date 2026
ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा हप्ता 20 डिसेंबरच्या आधी कधीही वाटप केला जाऊ शकतो म्हणजेच हप्ता येण्याची सर्वात शक्य तारीख 20 डिसेंबरपूर्वीचीच असते आता प्रश्न येतो की पुरवणी मागणी आणि परवानगी कधी दिली जाईल तर साधारणपणे 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर किंवा 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर या काळात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते त्यानंतर जीआर काढला जातो आणि मगच पैसे खात्यावर जमा होतात
नमो शेतकरी योजना चा 8 वा हफ्ता कोणाला भेटेल आणि केव्हा भेटेल
येथे एक गोष्ट नीट समजून घ्या अनेक ठिकाणी आज पैसे मिळणार उद्या पैसे मिळणार अशा प्रकारचे व्हिडिओ फिरताना दिसतात पण प्रत्यक्षात अजून मंजुरीही मिळालेली नाही आणि जीआर देखील आलेला नाही त्यामुळे अशी चुकीची माहिती मानू नका खरी आणि अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्ता जमा केला जातो म्हणून 20 डिसेंबरपूर्वी कधीही पैसे येऊ शकतात हे लक्षात ठेवा
ही माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि पुढील अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद
3 thoughts on “नमो शेतकरी योजना चा 8 वा हफ्ता कोणाला भेटेल आणि केव्हा भेटेल”