नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत Namo Shetkari Mahasnman nidhi yojna 8 installment date राज्यातील प्रत्येक शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता अलीकडे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला त्यामुळे साहजिकच राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे
आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार
हा हप्ता येणार आहे की अजून काही विलंब होणार या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या शब्दात माहिती आज आपण इथे घेणार आहोत
मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याआधी सध्याची परिस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे
त्यामुळे आचारसंहिता लागू आहे आचारसंहिता लागू असताना कोणत्याही मोठ्या आर्थिक योजनेचा निधी थेट वितरित करता येत नाही
हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकार सध्या थोडं थांबलेलं आहे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच सरकारकडून पुढचे निर्णय घेतले जातील
निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशासनाला मोकळा श्वास मिळेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय वेगाने घेतले जातील
यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा प्राधान्याने येतो राज्य सरकारने याआधीच एक मोठं विशेष पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसाठी असलेला निधी देखील समाविष्ट आहे
नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणासाठी लागणारा निधी याच पॅकेजमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणजेच निधीची कोणतीही अडचण नाही फक्त प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता बाकी आहे
मित्रांनो एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीच्या आधारेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळाला आहेज्ञतेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात ही प्रक्रिया आधीपासून निश्चित आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न
हा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारकडून महत्त्वाचा शासन आदेश काढला जाणार आहे
या आदेशानंतर लगेचच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगायचं झालं तर डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे याच दरम्यान शेतकऱ्यांमध्ये आणखी एक चर्चा सुरू आहे nsmny.mahait.org
सध्याच्या रकमेपेक्षा हप्ता वाढणार का
याबाबत सरकारकडून याआधी सकारात्मक संकेत देण्यात आले होते भविष्यात वार्षिक मदत वाढवण्याचा विचार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र सध्या तरी याबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही म्हणून आत्ता तरी हप्ता वाढीबाबत निश्चित काही सांगता येत नाही मित्रांनो तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
फक्त अधिकृत घोषणांवर आणि शासन आदेशांवरच विश्वास ठेवा हप्ता येण्यास थोडा उशीर होत असला तरी तो नक्की येणार आहे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणार नाही लवकरच नमो शेतकरी योजनेबाबत अधिकृत घोषणा होईल
आणि त्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल यासाठी तुम्ही तुमचं बँक खाते आधारशी जोडलेलं आहे का
केवायसी पूर्ण आहे का
हे सगळं एकदा तपासून घ्या पुढील आर्टिकल मध्ये आपण पीक विमा योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन येणार आहोत तो अपडेट प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयोगाचा असणार आहे म्हणून तो पोस्ट तुम्ही चुकवू नका आजच्या या माहितीपूर्ण आर्इटिकल थेच थांबतो
तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर ती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवापुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या
1 thought on “नमो शेतकरी योजना 8 वा हप्ता तारीख जाहीर ? | Namo Shetkari Mahasnman nidhi yojna 8 installment date”